आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंग

Chalisgaon | उपचार सुरु असतांना विनयभंग प्रकरणी एका डॉक्टराला दोन वर्षे सश्रम कारावास…

चाळीसगाव (झूम मराठी) चाळीसगाव शहरातीलश्री सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आयसीयुत उपचार घेणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चाळीसगाव न्यायालयाने शहरातील डॉ. मंगलसिंग परदेशी (50) यांना विविध कलमान्वये दोन वर्षे सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

  • काय आहे नेमके प्रकरण..?

शहरातील श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये पीडीत महिला 25 ऑक्टोंबर 2019 रोजी आयसीयूत उपचार घेत होती. डॉ. मंगलसिंग परदेशी यांनी ती आयसीयूत एकटी असताना पीडीत महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पीडीत महिलेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसांत डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात सहायक फौजदार बापूराव फकीरराव भोसले यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

  • महिलेला दहा हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश..

या फौजदारी खटल्याची सुनावणी चाळीसगाव येथील न्यायदंडाधिकारी एस. आर. शिंदे यांच्याकडे झाली. यात एकूण पाच जणांची साक्ष नोंदविण्यात आली. गुरुवार, 22 रोजी चाळीसगाव न्यायदंडाधिकारी वर्ग 1 न्या. एस. आर. शिंदे यांनी आरोपी डॉ. परदेशी याला भादंवि 354 अन्वये दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि सात हजार रुपये दंड (दंड न भरल्यास दोन महिने कारावास) अशी शिक्षा सुनावली. पीडित महिलेस रक्कम रुपये 10 हजार नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला. सरकार पक्षातर्फे अँड. मिलिंद येवले यांनी काम पाहिले. खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून रणजीत सोनवणे यांनी तर केस वॉच म्हणून पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण देवरे यांनी काम पाहिले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे