राजकीय

Kasba Bypoll Result: कसब्यात ‘कमळ’ कोमेजलं, ३० वर्षांत घडलं नव्हतं ते धंगेकरांनी ‘करून दाखवलं’; भाजपाचा गड काँग्रेसच्या ‘हातात’

कसब्याच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.

झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया@ उमेश पाटील 

कसब्याच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. या मतमोजणीत रविंद्र धंगेकरांचा विजय निश्चित झाला आहे. कसबा पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामध्ये रविंद्र धंगेकरांचा विजय झाला आहे. रविंद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी विजयी झाले आहेत. प्रदीर्घ काळापासून भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने मुसंडी मारली आहे.

कोण आहेत रविंद्र धंगेकर? 

रविंद्र धंगेकर यांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी धंगेकरांची ओळख राहिली आहे. मनसेमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केलं. इथंच त्यांची राजकीय कारकीर्द फुलली. रविंद्र धंगेकर हे कसब्यात मागील २५ वर्षांपासून नगरसेवक होते. त्यामुळे जनतेचा कायम त्यांना पाठिंबा राहिला आहे. त्यासोबतच ते सामान्यांचे नेते आहेत. रात्रीबेरात्री नागरिकांच्या कामाला धावून जातात, अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे सामन्यांपासून उच्चभ्रू लोकापर्यंत ते सगळ्यांचे लाडके नेते आहे. त्यांच्या या कामामुळे मतमोजणी सुरु झाल्यापासून ते आघाडीवर होते.

रविंद्र धंगेकर यांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास झाला आहे.

विकासकामांच्या जोरावर रविंद्र धंगेकर मनसेकडून २००९ ची विधानसभा निवडणूक लढली. यात त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार आणि तत्कालिन उमेदवार गिरीश बापट यांना तगडं आव्हान दिलं. मातब्बर बापट नवख्या धंगेकरांकडून अवघ्या ७ हजार मतांनी विजयी झाले. यातूनच खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. २०१४ मध्येही कसबा पेठेतून धंगेकरांनी निवडणूक लढवली. पण तेव्हा त्यांचा पराभव झाला. पुढे जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण २०१९ मध्ये काँग्रेसनं धंगेकरांऐवजी अरविंद शिंदेंना तिकीट दिलं होतं.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे