आपल खान्देश
पाचोरा एस टी कर्मचारी यांचा संपाला, संविधान आर्मी रक्षक सैनिक यांचा पाठिंबा.
पाचोरा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपला संविधान आर्मी रक्षक सैनिक यांचा पाठिंबा
ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला राज्य सरकारकडून अजून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे राज्यभरातील ९० पेक्षा जास्त एसटी आगारांचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.
पाचोरा येथे संपुर्ण महाराष्ट्र मध्ये सुरू असलेल्या एस टी कर्मचारी यांचा संप सुरू असून या संपला संविधान आर्मी रक्षक सैनिक यांचा पाठिंबा देण्यात आला आहे संविधान आर्मी महाराष्ट्र चीफ जगन भाई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा तालुका अध्यक्ष हिरालाल भाऊ सोनवणे व शहर अध्यक्ष संतोष मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते




