देश-विदेशब्रेकिंग

कर्नाटकातील येडियुरप्पा पर्वाचा अखेर: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

 कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा आज अखेर राजीनामा राज्यपाल यांना सोपवला आहे. त्यामुळे कर्नाटकतील राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्यांनी राजीनामा देण्याआधी 35 मिनिटे भाषण केले. यादरम्यान त्यांच्या डोळ्यांत बऱ्याचदा अश्रू आले. आपण भाजपला राज्यात मोठं करण्यासाठी काय काय केलं. याबाबत भावना व्यक्त केल्या.

वाढत्या वयामुळे केंद्रीय नेतृत्वाकडून येडियुरप्पा यांना राजीनामा देण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

येडियुरप्पा यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या भूषवल्या आहेत. कर्नाटक भाजपा प्रदेशाध्यक्षपासून ते विरोधी पक्ष नेता, विधान परिषद सदस्य या पदांवर ते राहिले आहेत. कला शाखेतून पदवी मिळवणाऱ्या येडियुरप्पा यांनी आणीबाणीच्यावेळी तुरुंगवासही भोगला आहे. समाज कल्याण खात्यात क्लार्क म्हणून काम करणारे येडियुरप्पा यांनी शिकारीपुरामध्ये एका तांदूळ कारखान्यातही क्लार्क म्हणून नोकरी केली आहे. शिवमोगामध्ये त्यांनी एक हार्डवेअरचे दुकानही सुरु केले होते.

येडियुरप्पा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिकारीपुरातील पुरसभा अध्यक्षापासून केली होती. १९८३ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.आठवेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चौथा कार्यकाळ आहे. या कारकिर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले.

कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून लिंगायत समाजाचे नेते मृगेश निरानी, बसवराज बोम्मई, वोक्कालिगा समाजाचे नेते अस्वथ नारायण, आर अशोक, सी टी रवी आणि प्रल्हाद जोशी यांच्या नावाची चर्चा आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे