माणुसकी समूहाचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या थाटात रक्तदान शिबिराने व सेवा गौरव पुरस्कार सोहळ्याने झाला साजरा,यामधे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे संचालक डॉ भूषण मगर यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार मोठ्या थाटामाटात सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूहाच्या वतीने प्रदान करण्यात आला. डॉक्टर भूषण दादा मगर यांनी कोरोणा च्या वेळेस केलेले कार्य आपले स्वतःचे खाजगी हॉस्पिटल शासनाला समर्पित करून महाराष्ट्रात पहिले कोविड सेंटर ठरले होते, रुग्णसेवेचे कार्य असेल, सामाजिक कार्य असेल त्यांच्यात नेहमी पुढाकार घेऊन काय रे ते करीत असतात.यावेळी महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थी उपस्थित होते.ते कार्यक्रमात बोलताना म्हणाले की माणुसकी ग्रुपच्या रूपात असा एक ग्रुप बघितला ते कोणतीही अपेक्षा न करता फक्त समाज सेवा करणे हाच त्यांचा धर्म आहे, आणि माणुसकी समूहाची टीम थांबणारी नाही तर समाजातील तळागाळातील गोरगरीब गरजूंना अहोरात्र मदत करणारी टीम आहे. डॉ भूषण मगर.(संचालक. विघ्नहर्ता हॉस्पिटल पाचोरा)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा