महाराष्ट्रराजकीय

100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना मोठा दिलासा? CBI कडून क्लिनचिट?

अनिल देशमुख यांना सीबीआयच्या प्राथमिक तपासात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, 29 ऑगस्ट: 100 कोटी वसुली प्रकरण राज्यात चांगलंच गाजलं होतं. या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना आपल्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. दरम्यान आता याच संदर्भातली मोठी बातमी समोर आली आहे. अनिल देशमुख यांना सीबीआयच्या प्राथमिक तपासात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर आली आहे. लोकमतनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे आरोप देशमुख यांच्यावर होते. या आरोपातून त्यांना सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याचं समजतंय. सीबीआयच्या 65 पानी प्राथमिक तपासाच्या अहवालाची प्रत सध्या समोर आली आहे.

उपअधीक्षक आर.एस. गुंजाळ यांनी हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात देशमुख यांच्याविरुद्ध एकही पुरावा मिळाला नसल्याचं म्हटलं आहे आणि म्हणूनच चौकशी बंद करण्यात येत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे सीबीआयच्या प्राथमिक अहवालात देशमुख यांना क्लिनचिट मिळाली असल्याचं बोललं जात आहे. यामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या देशमुखांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे