कौतुकास्पद – पाचोरा गरजू व कोरोना काळात गमावलेल्या पालकांच्या मुलांना शालेय गणवेश वाटप..
पाचोरा (प्रतिनिधी)पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री . गो.से. हायस्कूल च्यावतीने गरजू, होतकरू तसेच कोरोना काळात जीव गमावलेल्या पालकांच्या मुलांना विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. या शाळेत शिक्षकवृंद खुपच चिकाटीने व जिद्दीने काम करुन विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत आहे. शहरात इंग्लिश माध्यमाच्या मोठमोठ्या शाळा आहेत त्यातच चांगले शिक्षण आणि शिस्त व शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकवृंद नेहमीच झटत असतात.
सदर कार्यक्रम संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या उपस्थितीत व संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी शाळेतील जवळजवळ शंभर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी, गजानन पेट्रोल पंपाचे संचालक प्रमोद सोनार शाळेचे मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक एन. आर .पाटील, पर्यवेक्षक ए .बी अहिरे, अंजली गोहिल, प्रीतम सिंग पाटील, संगीता वाघ, कार्यालय प्रमुख अजय सिनकर, तांत्रिक विभागाचे मनीष बाविस्कर रणजीत पाटील, तसेच पदाधिकारी उपस्थित होते. पाचोरा शहरातील विविध सामाजिक राजकीय दात्यांनी शाळेसाठी गरीब होतकरू मुलांना गणवेश देऊन मुलाचे पुण्याचे काम केल्याने त्यांचा संस्थेतर्फे आभार व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. बोरसे यांनी केले तर अरुण कुमावत यांनी आभार व्यक्त केले.

