ब्रेकिंग

इंदूरहून पुण्याकडे निघालेली बस नर्मदा नदीत कोसळून 12 जन मृत्यूमुखी!

झूम मराठी

मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील खालघट संजय सेतू इथे मोठी दुर्घटना घडली आहे. इंदूरवरून अमळनेर येथे येणारी अमळनेर डेपोची बस ही मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत कोसळली असून ४० पेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस नर्मदा नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात यश आलं असल्याचे वृत्त एएनआय ने दिले आहे.

अमळनेर एसटी डेपोची बसचा नंबर MH 40 N9848 इंदूर येथून रिटर्न प्रवासात खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या कलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात ही बस कोसळली. यात सुमारे ४० वर प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, आज सकाळी १० वाजण्याचा सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस इंदूरहून पुण्याकडे निघाली होती. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे