महाराष्ट्रराजकीय

12 आमदारांचा तिढा सुटणार? राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आज भेटीला बोलावले!

12 आमदारांच्या यादीवरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये संघर्ष पाहण्यास मिळाला. अखेर हा वाद हायकोर्टामध्ये गेला.

राज्यपाल नियुक्त 12 आमदाराची यादी  गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित आहे. अखेर यावर तोडगा काढण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.

१२ आमदारांच्या यादीवरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमध्ये संघर्ष पाहण्यास मिळाला. अखेर हा वाद हायकोर्टामध्ये गेला. हायकोर्टाने हा निर्णय लवकर घेतला पाहिजे, असं मत नोंदवल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेट घेण्यासाठी आमंत्रण पाठवलं.

अखेर, आज, दुपारी ३.३० मिनिटांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते राजभवनावर जाणार आहे. यावेळी राज्यपालांसोबत आमदारांच्या यादीवर चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

मागील आठवड्यात 26 तारखेला ही भेट होणार होती. मुख्यमंत्री यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. पण राज्यपाल चार दिवस महाराष्ट्राच्या बाहेर दौऱ्यावर गेले होते. दुसऱ्याच दिवशी ते दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर दिल्लीत काही वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर ते उत्तराखंड इथं गेले होते. उत्तराखंडाचा दौरा करून आल्यानंतर राजभवनाकडून भेटीसाठी वेळ दिली आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेला आमदारांचा मुद्या मार्गी लागतो का हे पाहण्याचे ठरणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे