महाराष्ट्रराजकीय

उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार; निश्चित आमदारांची नावे समोर.

झूम मराठी वृत्त

मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगितले होते. शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीहून परतल्यानंतर त्यांच्यात बैठक झाली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार उद्याच करण्याचे ठरविण्यात आले. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार महिनाभरापासून रखडला होता. मात्र उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट, दादा भुसे आणि संदीपान भुमरे तर भाजपकडून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विखे पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांचे नाव निश्चित आहे.

सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आमदारांनाही भाजपकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यात संजय कुटे, बंडी भांगडिया, रविंद्र चव्हाण आणि अपक्ष आमदार रवी राणा यांचे नाव आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात २० ते २५ आमदारांना मंत्रिपद देण्यात येणार असून दुसरा टप्पा लवकरच होईल, असे सांगितले जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे