ज्या पत्रकाराची बातमी वाचण्यासाठी पाचोरा शहर वाट पाहायचा, फोकस न्यूजचे संपादक सचिन पाटील यांचं दु:खद निधन
सचिन पाटील यांचं उपचारा दरम्यान निधन झालं.
झूम मराठी
पाचोरा(झूम मराठी न्यूज नेटवर्क) पाचोरा शहरातील हुन्नरी पत्रकार तथा फोकस न्यूजचे संपादक सचिम (बाळा) पाटील यांचे मुंबईतील इस्पितळात पहाटे 2 वाजता उपचारा दरम्यान त्याचं दुःखद निधन झाले. सचिन पाटील यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सचिन (बाळा) पाटील यांचे मुंबईतील इस्पिळात पहाटे उपचारा दरम्यान त्याचं दुःखद निधन झाले सचिन पाटील हे वय वर्ष 45 वयाचे होते. ते पाचोऱ्यात कृष्णापुरी येथे आपल्या कुटुंबा सोबत वास्तव्यास होते. पाचोऱ्यातील हुन्नरी पत्रकार म्हणुन ओळखले जायचे. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.
पत्रकार ते संपादक हा त्याचा प्रवास सोपा नव्हता त्यांनी आपल्या आयुष्यात खूप संकट लिलया पेललित, आमचा सखा प्रिय मित्र सचिन तुला नेहमी आम्ही मिस करू तुझी ही जाण्याची वेळ होती का? आज ते आपल्यात नाहीत. जीवन इतकं चंचल आहे, असे झूम मराठीचे संपादक यांनी दुःख केले.




