ब्रेकिंग

Pachora | तालुक्यातील निपाणे शिवारात बिबट्याची दहशत, ऊसतोड महिलेवर केला हल्ला..!

  • दिलीप जय परदेशी

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा गावा जवळील निपाणे येथील शेतकरी हिरमण दीपचंद पाटील यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना मजूर महिलेवर बिबट्याने हल्ला केला. मात्र महिलेने आणि मजुरांनी आरडाओरड करताच बिबट्याने धूम ठोकली. ही घटना दि. १ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. पावलांच्या ठशांवरून हा बिबट्याच असल्याची पुष्टी वनविभागाने केली आहे. 

निपाणे ग्रामपंचायत सरपंच रोशन पाटील व गावातील युवकांनी पुढाकार घेत बराच वेळ बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न केला वनविभागाचे कर्मचाऱ्यांना पाचारण केले. त्यांनी पावलांच्या ठशांवरून हा बिबट्याच असल्याचे स्पष्ट केले आणि वनपाल प्रकाश देवरे यांनी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याआधी दिवाळी सणाच्या आधी बिबट्याची दहशत दिसून आली दि. १२ नोव्हेंबर रोजी सीताराम पाटील यांच्या शेतातील सात वासरांचा फडशा बिबट्याने पाडला होता. बिबट्याच्या वाढलेल्या वावरामुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे