आपल खान्देशमहाराष्ट्र

धुळ्यात पोलिस आणि अतिरेक्यांमध्ये मोठी धुम:चक्री.?

मात्र, हा प्रकार म्हणजे धुळे पोलिसांनीच रचलेला मॉक ड्रील असल्याचे उघडकीस आले. तेव्हा सार्‍यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

दुपारी बारा साडेबाराची वेळ… रोजच्या प्रमाणे धुळे बस स्थानक प्रवाशांनी आणि एस.टी. बसेसेने गजबजून गेले होते. प्रवाशाी इच्छीत बस शोधत स्थानकात फिरत होते. महिला, मुले, तरूण, वयोवृध्द असे सारेच प्रवाशी होते. आणि अचानक… हातात बंदुक घेवून तोंडाला रुमाल बांधलेले दोन जण स्थानकात खुलेआम पणे शिरले. आणि पाहता पाहता प्रवाशांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांना ताब्यात घेत जीवे ठार मारण्याची धमकी देऊ लागले. अचानकपणे झालेल्या या घटनेमुळे सार्‍या स्थानकात मोठा गोंधळ उडाला. जो तो जीवाच्या आकांताने सैरभैर पळू लागला. काय होतेय हे काहीच कळत नव्हते. आणि… समजले ते दोन अतिरेक्यांनी (militants) दोन प्रवाशांसह एका पोलिसालाही (police) ताब्यात घेेतले. पोलिसालाही अतिरेक्यांनी ताब्यात घेतल्याचे दिसताच प्रवाशांची मात्र चांगलीच धांदल उडाली.

धुळ्यात अतिरेकी शिरल्याची बातमी सर्वत्र पसरली. धुळे बसस्थानकावर अतिरेक्यांनी तीन प्रवाशांना वेठीस धरले. यामुळे प्रवाश्यांचा थरकाप उडाला. ही माहिती कंट्रोल रुमला मिळताच पोलिसांची कुमक दाखल झाली. यावेळी रेस्क्युसाठी पुढे आलेल्या एका पोलिसालाही अतिरेक्यांनी बंदी बनविले. त्यामुळे थरकाप उडाला. अतिरेकी विरुध्द पोलीस असा थरार सुमारे अर्धा तास रंगला. यावेळी संपूर्ण बसस्थानकाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले.अखेर पोलिसांनी अतिरेक्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी शस्त्र खाली ठेवले. ओलीस असलेल्यांची यशस्वी सुटका करण्यात आली. या घटनेनंतर धुळ्यात अफवांचा बाजार उठला. मात्र, हा प्रकार म्हणजे धुळे पोलिसांनीच रचलेला मॉक ड्रील असल्याचे उघडकीस आले. तेव्हा सार्‍यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे