आपल खान्देशब्रेकिंग

पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथील एका सशस्त्र सीमा बल जवानावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू !

पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली (खडकी) येथील सुटीवर आलेल्या भूषण आनंदा बोरसे (33) हे आपल्या दुचाकी वरून शेतातून परत येत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.


पाचोरा तालुक्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. यामुळे शेतात काम करत असलेल्या शेतकरी व मजुरांची चांगलीच तारांबळ उडाली. यात सुट्टीवर घरी आलेल्या एका जवानाचा (Lightning Strike) वीज पडून मृत्यू झाला. भूषण आनंदा बोरसे असे मृत जवानाचे नाव आहे. भूषण आनंदा बोरसे हे तालुक्यातील अंतुर्ली खडकीचे राहणार होते ते सशस्त्र सीमा बल (एसएसबी) मध्ये बिहारमध्ये कार्यरत होते. ते परवाच सुट्टीवर आले होते. दरम्यान, आज ते शेतात गेले होते. शेतातून दुचाकी वरुन परत येत असताना त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, भूषण आनंदा बोरसे हे परवाच सुट्टीवर आले होते. दरम्यान, आज त्यांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर पाचोरा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन या घटनेची नोंद केल्याची माहिती मिळाली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे