ओला दुष्काळ जाहीर करा; भडगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले
पाचोरा : ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र भडगाव तालुका कार्यकारिणीच्या वतीने राज्यभर शेतकरी पावसाने हैराण आणि हतबल झाल्याने तोंडी आलेला घास येण्याच्यावेळी पीक हातून गेले. जवळ होते तेवढे संपले म्हणून संघाच्या वतीने शासनाने ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा यासाठी भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरपंच डॉ. नीलकंठ पाटील, मोहन पाटील (महिंदळे), सुनिल वंजारी (पळासखेडे), कमलाबाई देसले (सावदे), पूजा विकास पाटील (वलवाडी), सुरेखा पाटील, अजय महाजन (पिंपरखेड), शोभाबाई पाटील (आमडदे), विजय पाटील (पांडरद ), समाधान पाटील (वडजी), दिपाली पाटील (बोदर्डे), दिव्या पाटील (महिंदळे), नकुल पाटील, वंदना बडगुजर, सुरेखा सुधाकर पाटील (वडज, ज्योती पाटील (वाक) आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा