नांदगाव रेल्वे स्टेशन परिसरात काम करून पोट भरणारा स्वाभिमानी अशोक वाणी यास आषाढी एकादशी निमित्ताने एक ड्रेस भेट
नांदगाव – प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- नांदगाव रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वर्षानुवर्षे काम करून पोट भरणारा स्वाभिमानी अशोक वाणी यांना आषाढी एकादशी निमित्ताने नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व रेल्वे कर्मचारी समाधान नंदकुमार खैरनार व सुनील श्रीधर काळे यांच्याकडून नवीन ड्रेसची भेट देण्यात आली.
नांदगाव शहरातील अशोक वाणी हा गेल्या कित्येक वर्षापासून नांदगाव रेल्वे स्टेशन परिसरात उघड्यावर रहात असून प्रवासी वर्गाचे ओझे वाहुन आपले पोट भरतो. कुणाकडूनही भिक न मागता चालता येत नसतानाही प्रवाशांची ओझे वाहून जे देतील ते पैसे घेऊन आपली उपजीविका करत असतो. नांदगाव रेल्वे स्टेशन परिसरात ज्या ही वेळेस काही खातो त्यावेळेस त्याच्या आजूबाजूला कावळे गोळा होतात. व तो सुद्धा त्या कावळ्यांना आपले अन्न देत असतो. अशा या स्वाभिमानी अशोक वाणी ने बऱ्याच दिवसापासून अंगावरील कपडे बदलले नव्हते. त्याला आषाढी एकादशीच्या निमित्ताने नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व रेल्वे कर्मचारी समाधान खैरनार आणि सुनील काळे यांनी नवीन ड्रेस आणून त्यास घातला. त्यावेळेस अशोक वाणीच्या चेहऱ्यावर जे हास्य फुलले ते पाहून साक्षात श्री पांडुरंग चे दर्शन झाले. असे समाधान करणार व सुनील काळे यांनी सांगितले



