ब्रेकिंगमराठवाडा

वरळीचा कौटुंबिक ‘तमाशा’ परळीत, ‘उघड’ करायला आली अन ‘अटक’ झाली

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडे शर्मा यांनी आपले शोषण होत असल्याचे आरोप केले आहेत. याप्रकरणी सगळी माहिती देण्यासाठी रविवारी करुणा मुंडे बीड जिल्ह्यात परळी येथे आल्या होत्या, मात्र येथे आल्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी करुणा मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत एट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात फिर्याद दिली. त्यानुसार करुणा मुंडे यांच्या विरोधात ऍट्रॉसिटीचा तर त्यांचे वाहन चालक दिलीप पंडित यांच्या विरोधात विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी परळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जातीवाच शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ड्रायव्हरला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंबाजोगाई कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.

पोलिसांनी आज करुणा शर्मा यांना कोर्टात दाखल केलं होतं. त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. दोन्हीकडची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने करुणा शर्मांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर ड्रायव्हरला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर शर्मा यांनी जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. मी तपास कार्यात सहकार्य करण्यास तयार असून मला जामीन द्यावा, असं शर्मा यांनी कोर्टाला स्पष्ट केलं आहे. शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आलं होतं. त्यामुळे शर्मा यांच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

काल दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे