महाराष्ट्र

साकीनाका बलात्कार-हत्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा..

मुंबई :- साकीनाका (Sakinaka) परिसरात मागील वर्षी सप्टेंबरमध्ये भयानक हत्याकांड घडले होते. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले होते. यामध्ये एका ३० वर्षीय महिलेवर आरोपीने बलात्कार करून तिची हत्या केली होती. घटनेनंतर संबंधित महिलेचा मृतदेह एका टेम्पोमध्ये आढळून आला होता. पोलीस तपासादरम्यान, आरोपीने महिलेच्या गुप्तांगामध्ये लोखंडी रॉड टाकून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहितीदेखील समोर आली होती.

साकीनाका बलात्कार- हत्याकांडानंतर (Sakinaka rape-murder case) याची गंभीर दखल राज्य महिला आयोग व केंद्रीय महिला आयोगाने घेतली होती. त्यानंतर हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते.

साकीनाका बलात्कार-हत्याप्रकरण ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे सांगत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी राज्य सरकारतर्फे करण्यात आली होती. दिंडोशी सत्र न्यायालयाने साकीनाका बलात्कार-हत्याप्रकरणात आरोपी मोहन चौहानला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे