दिव्यांगांना अन्नसुरक्षा योजनेत व अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांतीच्या वतीने पाचोरा तहसीलला निवेदन
पाचोरा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव भगिनींना अन्न सुरक्षा योजनेत व अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यासाठी पाचोरा तालुक्याचे प्रहार दिव्यांग क्रांती चे शहर अध्यक्ष महेश भाऊ व प्रहार दिव्यांग चे पदाधिकारी यांनी पाचोरा तहसीलदार यांना निवेदन दिले.
प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन आदरणीय राज्य मंत्री बच्चू भाऊ व राज्य कार्यकारणी चे वरिष्ठ माननीय बापू राव काने साहेब रामदास जी खोत व अभय साहेब आणि आदरणीय कविता ताई साहेब यांच्या वरिष्ठ पातळीवरील जो सातत्याने लढा दिला त्याला यश आले असून त्याचा पूर्ण भारतात दिव्यांग बांधव भगिनींना व निराधार महिला व अनेक घटकातील व्यक्तींना अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेचा व तसेच ६०० रुपये पगार होती तरी आज रोजी १०००रु याच प्रहार दिव्यांग क्रांती मुळे गरीब जनतेस मिळाले.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव भगिनींना अन्न सुरक्षा योजनेत व अंत्योदय योजनेत समाविष्ट करण्यासाठी पाचोरा तालुक्याचे प्रहार दिव्यांग क्रांती चे शहर अध्यक्ष महेश भाऊ व प्रहार दिव्यांग चे पदाधिकारी यांनी पाचोरा तहसीलदार यांना निवेदन दिले.




