पाचोरा तालुक्यात ठीक ठिकाणी पाऊस कमी जास्त प्रमाणात पडला असला तरी पावसाल्यात आजाराचे प्रमाण वाढत असतानाचे चित्र सध्या पाचोरा शहरात पाहायला मिळत आहे. शहरात घराआड डेंगू आणि मलेरियाचा रुग्ण आडळून येत आहॆ पावसाळी आजाराच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ होताना दिसून येत आहॆ. पाऊस कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. या डबक्यामध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असते. त्या डासांमुळे मोठ्या प्रमाणात मलेरिया आणि डेंग्यूचे प्रमाण अधिक वाढत आहे. त्यामुळे पालिकेने सर्व परिसरात फवारणी सुरु केली आहे.



