आपल खान्देश

कॉग्रेस जळगाव जिल्हाअध्यपदी प्रदीप पवार, जिल्ह्यात आनंदाचे वातावरण

कॉग्रेस जळगाव जिल्हाअध्यपदी प्रदीप पवार : फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त होताना दिसत आहे

जळगाव कॉँग्रेस जिल्हाध्यक्षपदी प्रदीप गुलाबराव पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रीय जनरल सचिव के.सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी ७ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी केली आहे.

जळगाव (प्रतिनिधी) :- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी प्रदीप पवार यांची निवड झाली असून या निवडीबद्दल भडगाव शहरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तर जळगाव मुख्यालयात ढोल-ताशे लावण्यात आले

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष पदावर प्रदीप पवार यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र आज दि. ७ अॉक्टोंबर रोजी दिल्ली येथुन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मान्यता देऊन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नियुक्ती चे पत्र पाठवले आहे. या निवडी बद्दल भडगाव शहरात फटाक्यांची आतषबाजी सेवादल जिल्हाध्यक्ष संजय पाटील सह पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, माजी पंचायत समिती सभापती इस्माईल शेख फकीरा, सरचिटणीस प्रताप पाटील, अल्पसंख्याक जिल्हा सचिव इरफान मनियार, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, भडगाव शहर अध्यक्ष दिलीप शेंडे, उपाध्यक्ष रतीलाल महाजन, अल्पसंख्याक उपाध्यक्ष याकुब पठाण, तालुका अध्यक्ष कमरअली पटवे, आदी उपस्थित होते. जळगाव शहरातील कॉंग्रेस मुख्यालयात ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला आहे

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे