आपल खान्देश

राज्य सरकारने रामोशी, बेरड समाजाच्या विकासासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ मार्फत 50 कोटी रुपयांचा निधी मंजुर

चाळीसगाव (प्रतिनिधी) राज्य सरकारने सरकारने रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या विकासा साठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून 50 कोटी रुपयांचा निधी मंजुर केल्या बद्दल शिंदे फडणवीस सरकारच्या प्रतिनीधी म्हणून जय मल्हार क्रांती संघटना जळगांव जिल्हा च्या वतीने खासदार  उन्मेश दादा पाटील तसेच आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी महाराष्ट्र राज्य कोअर कमेटी सदस्य, महाराष्ट्र राज्य सहकार्याध्यक्ष रमेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली रामोशी, बेरड, बेडर समाज बांधव यांनी चाळीसगांव तालुका कार्यलयात  उपस्थित राहून घोषणाबाजी करत पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन तसेच पेढे भरवुन शिंदे फडणवीस सरकारचे आभार मानले. यावेळी प्रमुख उपस्थिती जळगांव जिल्हा मुख्य मार्गदर्शक प्रकाश माऊली वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष  संतोष धर्मा वाघ, चाळीसगांव तालुका अध्यक्ष  चाळीसगांव ता.उपाध्यक्ष भास्कर(आण्णा)मोरे, ज्येष्ठ समाज सेवक भास्कर धुडकू वाघ, युवक-अध्यक्ष दिपक भाऊ काकडे, युवक समीती सदस्य धनराज सखाराम वाघ, युवक सह कार्याध्यक्ष विक्की दादा कोळी तसेच जय मल्हार क्रांती संघटनेचे चाळीसगांव तालुक्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते, व तमाम समाज बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे