आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

कासमपुराच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेत भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 

# भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा


लोहारा कासमपुरा वृत्त | देशभरात १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय कासमपुरा शाळेत ध्वजारोहण, राष्ट्रगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

स्थानिक पातळीवर आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे, नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करत देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

“देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन करत, देशाची एकता, अखंडता आणि संविधानिक मूल्ये जपण्याचा संकल्प करूया,” असा संदेश यावेळी देण्यात आला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण परिसरात तिरंगा आणि देशभक्तीच्या घोषणांनी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री.सुदामसिंग शा. परदेशी ( जेष्ठ नागरिक ) शहापुरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी श्री. धनराजशेठ परदेशी हे होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गिते, व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या वेळी गावातील प्रतिष्ठीत नागरिक श्री. सतीशभाऊ गवळी, पिंटुभाऊ पाकळ, यशवंत हटकर, रतनजी पांडे , नंदुभाऊ मर्मट, राजेंद्र खरे, गोपाल जोनवाळ, गोकूळ महेर, दिलीप मर्मट, राजू महेर, बैसाणे अप्पा( ग्रामसेवक) दिलीप कोळी, चंदू खरे, हिरालाल कायटे, नामदेव कोळी व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होती. सर्व उपस्थितांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्री. योगेशभाऊ राजपूत व मुख्याध्यापक श्री. किरण चौधरी सर, तसेच कवायत संचालन ज्येष्ठ शिक्षक धोनी सर यांनी केले.

तर कार्यक्रमचे आयोजन व यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वानखेडे मॅडम व सौ. दिपिका मॅडम यांनी केले. तर आढावसर यांनी आभार प्रदर्शन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे