प्राथमिक शिक्षकांच्या पारोळा सोसायटीचा स्तुत्य निर्णय – मयत कर्मचाऱ्याच्या पत्नीला दहाव्याच दिवशी अनुकंपा तत्वावर नोकरी आदेश
या निर्णयामुळे समाजात सहकार भावनेचा व कार्यकर्तव्य निष्ठेचा एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे.
- झूम ऑनलाईन @ दिलीप परदेशी
पाचोरा | जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतपेढी, मुख्य कार्यालय पारोळा येथे कार्यरत कर्मचारी प्रदीप वसंत वाघ यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. प्रगती पॅनलचे अध्यक्ष व अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे अध्यक्ष सचिन युवराज वाघ, उपाध्यक्ष मनोज प्रकाश पाटील व संचालक मंडळाने एक आदर्श निर्णय घेतला.
गंधमुक्ती व उत्तरकार्याच्या दिवशीच, मयत कर्मचारी कै. प्रदीप वाघ यांच्या पत्नी ग.भा. वर्षा प्रदीप वाघ यांना अनुकंपा तत्वावर नोकरीचा आदेश देण्यात आला. पाचोरा येथील महालपुरे मंगल कार्यालयात १४ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब मनोहर गिरधर पाटील, सोसायटीचे चेअरमन सचिन वाघ, उपाध्यक्ष मनोज पाटील, संचालक भागवत हाडपे, प्रविण पाटील, अनिल पाटील, अशोक इसे, गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील यांच्या हस्ते आदेश देण्यात आला.
या प्रसंगी माजी चेअरमन अनिल एकनाथ पाटील, राजेंद्र ठाकरे, जतनसिंग राजपूत, केंद्रप्रमुख कैलास देवरे, चंद्रकांत मोराणकर, शांताराम वानखेडे, खाजगी पतसंस्थेचे संचालक राकेश पाटील, राजेंद्र भिमराव पाटील, विपीन वसंतराव पाटील, विलास भास्कर पाटील, राजीव पद्मे, जितेंद्र वानखेडे, रामकृष्ण बाविस्कर, प्रदिप भाऊराव वाघ, शिसोदे सर, मनोज पवार, आमदार किशोर पाटील यांचे स्वीय सहाय्यक राजु पाटील, विभागीय अधिकारी नेरपगार, शाखाधिकारी संजय साळुंखे, कर्मचारी सुनिल चौधरी यांच्यासह त्यांचे सर्व आप्तेष्ट नातेवाईक उपस्थित होते.
या निर्णयामुळे समाजात सहकार भावनेचा व कार्यकर्तव्य निष्ठेचा एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे.



