मधुर खान्देश‘ वर शुभेच्छांचा वर्षाव; पहिला वर्धापन दिन जल्लोषात साजरा.
महाजन परीवारावर शुभेच्छाचां वर्षाव
झूम मराठी ऑनलाईन | दिलीप जय परदेशी
साप्ताहिक ‘मधुर खान्देश’ वर प्रेम करणार्या हजारो वाचकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी एकत्र येत साप्ताहिक ‘मधुर खान्देश ’वर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा अखंड वर्षाव केला. वाचकांच्या दृढ विश्वास आणि निस्सीम प्रेमाच्या बळावर साप्ताहिक ‘मधुर खान्देश’ चा पहिला वर्धापन दिन शुक्रवारी पाचोऱ्यात मोठया थाटात साजरा झाला.
‘मधुर खान्देश’ वर्धापन दिनाचा स्नेहमेळावा म्हणजे विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह आप्तेष्ट, मित्रांना भेटण्याचे जणू हक्काचे दिसत होते. कालच्या या स्नेहमेळाव्यात अनेकांनी परस्परांशी हस्तांदोलन करत, तर कोणी गळाभेट घेऊन शुभेच्छा देत साप्ताहिक ‘मधुर खान्देश’वरील आपले प्रेम व्यक्त केले. सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला.
प्रशासकीय सेवेत काम करतांना समाजसाठी नेहमीच उल्लेखनिय कामगिरी ठसा चांगले एक चांगला
पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील सह प्रांतधिकारी भुषण अहिरे, पोलीस निरक्षक अशोक पवार, राष्ट्रवादीचे स्थानिक नेते विकास पाटील, पत्रकार आबा सूर्यवंशी यांनी साप्ताहिक ‘मधुर खान्देश’वरील आपले प्रेम व्यक्त करत मधुर खान्देश ला शुभेच्छा देत महाजन परिवारांवर शुभेच्छांचा वर्षांव केला. ‘मधुर खान्देश’चे संपादक राहुल महाजन यांचे थोरले बंधू अनिल महाजन (मंत्रालय वरिष्ठ पत्रकार) सह त्यांचे आई वडील यांचा आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सत्कार केल्याने महाजन परिवार भारावून गेल्याचे दिसत होते.
व्यासपीठ मान्यवारांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात साप्ताहिक ‘मधुर खान्देश’चा गवगवा असल्याचे सांगितले. मधुर खान्देश’चे संपादक राहुल महाजन यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. तसेच प्रशासनाच्या सकारात्मक कामातदेखील बळ दिले. ‘मधुर खान्देश’चे युट्युब, ऑनलाईन पोर्टल, आणि साप्ताहिक स्वरूपात वाचका पर्यत पोहचतो, मधुर खान्देश’चे दर्जा दिवसेंदिवस वाढतो आहे. पाचोरा भडगाव तालुक्यातील अनेक समस्या सोडवताना आम्हाला मधुर खान्देश मधील बातम्यांचा आधार घ्यावा लागला आहे. महाजन कुटुंब गेल्या वीस वर्षापासून वाचकांच्या मनावर राज्य करत आहे, असे बोलतांना सांगितले.
वाचकांनी दाखविलेल्या आपुलकीने आणि स्नेहाने ‘मधुर खान्देश’चा हा पहिला वर्धापन दिन अविस्मरणीय ठरला.
मधुर खान्देश’ वर्धापन दिन याप्रसंगी व्यासपीठावर स्थानिक आमदार किशोर पाटील, प्रांताधिकारी भुषण अहिरे, तहसिलदार विजय बनसोडे, पोलिस निरीक्षक अशोक पवार, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, भाजपाचे मधुकर काटे, नंदु सोमवंशी, गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक अनिल भाऊ महाजन, एम. एस. पी. बिल्डकाॅनचे संचालक मनोज पाटील, गजानन पेट्रोल पंपाचे संचालक प्रमोद सोनार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, अश्विनी अॅटो मोबाईलचे संचालक संजय एरंडे, तसेच पाचोरा सह जळगावचे पत्रकार उपस्थित होते.


