ठाकरे सरकारसाठी धोक्याची घंटा, जनमत चाचणीत …
यूट्यूब आणि ट्विटरवरून हा पोल घेतलाय..
झूम मराठी
पाच राज्यांच्या निवडणूक निकालाने राजकीय परिस्थिती बरीच बदलली आहे. चार राज्यांत भाजपाचे सरकार येणार आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या जनमत चाचणीने राज्यातील मविआ सरकारला धोक्याचा इशारा दिला आहे. मविआ सरकार व सरकारमधील वादांची नेहमीच चर्चा होत असते. सरकारमध्ये सर्व व्यवस्थित सुरू नाही, असा संदेश जनतेत गेला आहे.
यूट्यूबचा पोल काठावर
tv9 या वृत्तवाहिनीने यूट्यूब आणि ट्विटरवरून हा पोल घेतला. ९४ हजार लोकांनी मते नोंदवलीत. ४६ टक्के लोक मविआला मतदान करणार असे म्हणत आहेत. तर ४५ टक्के भाजपला मत देणार म्हणत आहेत. पोलचा कल अगदी काठावर आहे. ही महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा आहे. ९ टक्के लोक इतर पर्यायाचा विचार करत आहेत.

ट्विटरच्या पोलमध्ये भाजपा सुसाट
ट्विटरवर ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी भाजपाला पसंती दिली. हा आकडा तर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे धाबे दणाणायला लावणारा आहे. ट्विटरवरच्या पोलवर केवळ ३१ टक्के मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत! ८ टक्के लोक इतर पर्यायाचा विचार करत आहेत.


