पाचोरा लाईव्ह – शिवजयंती उत्सव निमित्ताने शिवस्मारकाची साफसफाई, विद्युत रोषणाई कारण्यात आली
पाचोरा नगर पालिका प्रसासानाने शिव स्मारक शिव जयंतीला सुसज्ज केले आहॆ.
झूम & पाचोरा लाईव्ह
पाचोरा (दिलीप परदेशी ) पाचोरा शहरातल्या शिव स्मारक परिसरात वेळोवेळी साफसफाई करून दिवाबत्तीची दुरुस्तीसाठी बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पाचोरा यांच्यावतीने मागणी करण्यात आली होती त्या मागणीची दखल घेत पाचोरा नगरपालिका प्रसासानाने शिवस्मारक शिव जयंतीच्या पूर्व संध्येला सुसज्ज केले आहॆ.


पाचोरा नगर पालिकेच्या प्रशासक यांच्या कार्यकाळात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची योग्य ती भरभक्कम महत्वाची कामे करुन शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सजावट करुन संपूर्ण चौक परिसरात पताका, भगवे झेंडे लावुन विद्युत रोषणाई करून शिव स्मारक सुशोभीकरण करण्यात आली . काल पासून शहरातील तरुणाई आप आपल्या मोबाईल मध्ये सेल्फी घेत आनंद व्यक्त करीत आहेत.
पाचोरा नगर पालिकेच्या कर्तव्यदक प्रशासक तथा मा.मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांचे तसेच तमाम नगर पालिका अधिकारी,कर्मचारी यांचे संपुर्ण शहरातुन कौतुक करण्यात येत आहे पाचोरा शहरात इतर सर्वच शासकीय विभागात पाचोरा नगर पालिकेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यां सारखेच अधिकारी लाभले पाहिजेत हिच शिवजयंतीच्या पावणमुहुर्तावर प्रमुख मागणी बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष हरीभाऊ तुकाराम पाटील यांनी झूम मराठीशी बोलतांना व्यक्त केली.




