कुसूंब्यात भाजपच्या विकास कामांचा बॅनर अज्ञातांनी फाडले.
झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया
कुसुंबा (झूम मराठी) कुसुंबा जिल्हा परिषद गटातील विकासकामांचे बॅनर जि.प सदस्य संग्राम पाटील व सदस्य रितेश परदेशी यांच्या विकास कामांचा बॅनर कुसुंबा बस स्थानक आवारात लावण्यात आले होते सदर विकास कामांचा बॅनर काल रात्री काही अज्ञातांनी फाडून टाकला असून त्यावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते व पदाधिकारीनीं संताप व्यक्त केला. जि. प सदस्य संग्राम पाटील व पं स सदस्य रितेश परदेशी यांनी पदाधिकारीनां शांत राहण्याचे आवाहन केले आहॆ.
कुसुंबा जिल्हा परिषद गटातील विकासकामांचे बॅनर जि.प सदस्य संग्राम पाटील व सदस्य रितेश परदेशी हे भाजप पक्षाचे असल्यामुळे त्या बॅनरवर भाजपच्या बड्या नेत्यांचे फोटो देखील होते. बॅनर फलकावर जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील विकास कामांचा सोबत मंजूर विकास कामाचे फलक लावले होते. अज्ञातांनी ते फाडल्याचे दिसून आले रात्री घडलेला प्रकार सकाळी उघडकीस आला. तेथील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संताप व्यक्त केला असून त्या प्रकाराबद्दल ग्रामस्थांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे.




