ब्रेकिंग

कोरोना दिलासा, 24 तासातील नवीन रुग्णांची संख्या घटली !!

24 तासातील नवीन रुग्णांची संख्या घटली कोरोना दिलासा, 24 तासातील नवीन रुग्णांची संख्या घटली

29 March 2021  राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना लॉकडाऊनची टांगती तलवार निर्माण झाली आहे. पण सोमवारी मात्र दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या रविवारच्या तुलनेत कमी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 31 हजार 643 रुग्ण आढळले आहेत. तर २०,८५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.७१% एवढे झाले आहे. पण राज्यात 24 तासात १०२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.९८ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात १६ लाख ०७ हजार ४१५ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर १६ हजार ६१४ व्यक्ती सांस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत. रविवारी दिवसभरात राज्यात १०८ रूग्णांचा मृत्यू झाले तर सर्वाधिक अशा ४० हजार ४१४ नवीन रुग्ण आढळले होते. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावावे लागेल असे स्पष्ट् संकेत मुख्यमंत्र्यांनी देऊन टाकले आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात अऩेक ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाहीयेत. तर अनेक ठिकाणी औषधी संपल्याच्या तक्रारी येत आहेत 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे