आपल खान्देशकृषीवार्ता

व्हिडीओ – मना वावर, मना ७/१२मीच नोंदसू मना पिकपेरा! आ.कुणाल पाटील यांचे आहिराणी भाषेतून आवाहन

आपल्या गोड आणि रसाळ अहिराणी बोली भाषेत धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी ई पिक पहाणी या शासनाच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनव्दारे पिकाची नोंद करण्यासाठी शेतकर्‍यांना आवाहन केले

दिलीप परदेशी

धुळे- (प्रतिनिधी) ग्रामीण विधानसभा ०६- शासननी ई पिक पाहणी नावनं याप तयार करेल शे. आते तुम्हना ७/१२वर पिकेस्नी नोंद करासाठी तलाठी आप्पानी वाट दखानं काम नही. तुम्हीच आते मोबाईलवर ई पिक पाहणी हाई याप डाऊनलोड करा आणि तुम्हीच पिकनी नोंद करु शकतस. मन वावर मना सातबारा मीच नोंदसू मना पिकपेरा.

अशा आपल्या गोड आणि रसाळ अहिराणी बोली भाषेत धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी ई पिक पहाणी या शासनाच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनव्दारे पिकाची नोंद करण्यासाठी शेतकर्‍यांना आवाहन केले आहे. आ.पाटील यांनी आपल्या बोली भाषेत केलेल्या आवाहनामुळे शासनाची हा महत्वाकांक्षी उपक्रम ग्रामीण भागापर्यंत पोहचण्यास चांगलीच मदत होणार आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शासनाच्या अनेक योजना ह्या शेतकरी आणि सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचतच नाहीत. काही योजना समजण्यास किचकट,कागदपत्रांमुळे हातळण्यास अडचणीच्या ठरत असतात.

त्यामुळे संबधित लाभार्थी शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहतो. महाराष्ट्र सरकारने शेतकरी व तलाठ्यांचा वेळ वाचावा आणि जास्तीत जास्त शेतकर्‍यांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा म्हणून ई पिक पहाणी हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार केले आहे. या उपक्रमाचा दि.१५ऑगस्ट २०२१ पासून शुभारंभ झाला आहे. ई पिक पहाणी अ‍ॅप्लिकेशनमुळे कृषी योजनांच्या लाभाबरोबरच चांगली बाजारपेठ, योग्य बाजारभाव याचाही फायदा होणार आहे.शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या या महत्वपूर्ण उपक्रमापासून आणि शासनाच्या योजनांपासून शेतकरी वंचित राहून नये म्हणून धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी खान्देशात प्रामुख्याने बोलली जाणार्‍या आहिराणी बोली भाषेतून ई पिक पहाणी या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनव्दारे आपल्या पिकांची नोंदणी करण्यासाठी आवाहन केले आहे. आपल्या आवाहनात आ.कुणाल पाटील यांनी सांगितले आहे कि, सर्वा शेतकरी भाऊ बहिनीस्ले राम राम सर्वास्ले मन्ह आवाहन आणि विनंती से कि, शासननी ई पिक पहानी नावनं याप तयार करेल से. आते तुम्हना ७/१२वर पिकेस्नी नोंद करासाठी तलाठी आप्पानी वाट दखानं काम नही. तुम्हीच आते मोबाईलवर ई पिक पाहणी हाई याप डाऊनलोड करा आणि तुम्हीच पिकनी नोंद करु शकतस. मन वावर मना सातबारा मीच नोंदसू मना पिकपेरा.मोबाईलवर गुगल प्ले स्टोरम्हा हाई याप डाऊनलोड करा. तठे तुम्हना मोबाईलवर नंबर टाका, चार अंकी पासवर्ड भेटी. तो पासवर्ड कायम काममा ई. तुम्हीच पिकना फोटो काढीसन या यापम्हा टाका. म्हनजे पिक विमा, नुकसान भरपाई, सरकारी अनुदान, ठिबक सिंचन अनुदान, पिक कर्ज आसा सर्व्या सवलतीस्ना फायदा लेवानं या यापवरथाईन सोप व्हयी. १५ऑगस्ट ते१५सप्टेंबर आसा एक महिना भरमा तुम्हना वावरमाईन पिकेस्नी नोंद करा. अशा प्रकारे साध्या आणि सोप्या भाषेत शेतकर्‍यांना समजेल अशा शब्दात आ.कुणाल पाटील यांनी आवाहन केले आहे. आ.पाटील यांच्या आवाहनामुळेे ई पिक पहाणी नोंदणी उपक्रम जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत पोहण्यास मदत होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे