गुन्हेगारी

250 गाड्या परस्पर गहाण ठेवणाऱ्या, पुण्यात माजी उपसरपंचाला अटक!!

250 गाड्या परस्पर गहाण ठेवणाऱ्या, पुण्यात माजी उपसरपंचाला अटक!!

पिंपरी चिंचवड : गाडी विकत घ्या, मी ओळखीने कंपनीत लावतो, असं सांगत भाड्याने घेतलेल्या सुमारे 250 गाड्या परस्पर गहाण ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा पुण्यातील माजी उपसरपंच आहे.

काय आहे प्रकरण? माझी कंपन्यांमध्ये ओळख आहे. तुम्ही गाडी विकत घ्या, मी ती कंपनीत लावतो, असे सांगून महाभागाने नागरिकांना महागड्या गाड्या घेण्यास भाग पाडले. त्यानंतर भाड्याने घेतलेल्या सुमारे 250 गाड्या परस्पर गहाण ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्‍यातील साबळेवाडी येथे ही घटना घडली.

20 महागड्या गाड्या हस्तगत

माजी उपसरपंचाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक कोटी 96 लाख रुपये किंमतीच्या 20 महागड्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. सागर मोहन साबळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो साबळेवाडी गावात 2014 मध्ये उपसरपंच होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे