गुन्हेगारीब्रेकिंग

मोठी कारवाई! धुळे पोलिसांनी ९० तलवारी हस्तगत करत चार जणांना घेतलं ताब्यात

धुळ्यातील सोनगीर गावाजवळ पोलिसांनी एका वाहनातून तलवारीचा मोठा साठा जप्त केला असून त्यासह चार जणांना अटक केली आहे. वाहनासह ७ लाख १३ हजार रुपये किमतीच्या ९० तलवारी आणि १ खंजीर जप्त करण्यात आले आहे.

झूम मराठी वृत्तसेवा

धुळे : सोनगीर पोलिसांनी स्कॉर्पिओ तब्बल 90 तलवारी व एक खंजीर जप्त करीत जालन्यातील चौघांना अटक केली होती. संशयीतांना धुळे न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 2 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, सोनगीर पोलिसांकडील तपास आता धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

  • कारवाईने राज्यात खळबळ

शिरपूरजवळील वाघाडी फाट्याजवळ बुधवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास स्कॉर्पिओ (क्रमांक एम.एच.09 सी.एम. 0015) मधून सोनगीर पोलिसांनी 90 तलवारी व खंजीर जप्त केला होता. या प्रकरणी संशयीत आरोपी मोहम्मद शरीफ मोहम्मद शफिक (35, सिद्धार्थ नगर, चंदन जिरा, वैशाली किराणाजवळ, जालना), शेख इलियास शेख लतिफ (32, सिद्धार्थ नगर, चंदन जिरा, वैशाली किराणाजवळ, जालना), सैय्यद नईम सैय्यद रहिम (29, सुंदर नगर, चंदन जिरा, एस.टी. वर्कशॉपमागे, जालना), कपिल विष्णू दाभाडे (चंदनजिरा, पंचशील नगर, बुद्धविहाराजवळ, जालना) यांना अटक करण्यात आली होती.

आरोपींनी राजस्थानच्या चितोडगड येथून या तलवारी खरेदी केल्याची कबुली दिली असून या तलवारींचे जादा किंमतीने जालन्यात विक्री करणार असल्याची कबुलीही दिल्याची माहिती आहे. धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आता राजस्थानातील चितोडगड येथे तलवार प्रकरणाच्या तपासार्थ जाणार असून मोठी शस्त्र तस्करांची टोळी जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिक तपास धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील व सहकारी करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे