मृगात जोरदार पावसाची पाचोरा तालुक्यात सलामी! वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान…
पाचोरा तालुक्याच्या बहुतांश भागात शुक्रवारी रात्री मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी वादळी वाऱ्यासह वरुण राजाने दमदार हजेरी लावत सलामी दिली. जोरदार वादळामुळे दाणादाण उडाल्यामुळे बळीराजाला एकीकडे पावसाच्या आगमनाचा आनंद तर दुसरीकडे नुकसानीमुळे डोळ्यांत मात्र अश्रूंच्या धारा आहेत, वादळामुळे नगरदेवळा आणि नांद्रा शिवारात केळी बागाचे अतोनात नुकसान झाले.
तालुक्यातील अनेक गावांत चांगलाच वादळी पाऊस झाल्याने अनेक शिवारात झाडे पडली तर विजेचे अनेक खांब वाकले. असाच जोरदार पाऊस झाला तर पाणी, चारा समस्या दूर होईल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहे. मृग नक्षत्रात पाऊस झाला तर वर्षभर पावसाचे सातत्य राहू शकेल,
खांब, तारा तुटल्याने वीज खंडित रात्री उशिराच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांचे खांब वाकल्याने, वीज तारा तुटल्याने रात्रीपासून वीज पुरवठा खंडित झाला. बिघाड दुरुस्तीसाठी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी परिश्रम घेत असून मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसाने वीज वितरण कंपनीचेही नुकसान झाले आहे.



