पिंपरी-चिंचवड पालिकाने नोटीस विना झोपडपट्टीत अतिक्रमण विभागाची कारवाईत, स्थानिकांचे हाल, पालिकेवर रोष
उमेश पाटील
पिंपरी-चिंचवड. (प्रतिनिधी उमेश पाटील) पिंपरी-चिंचवड पालिकेची अतिक्रमण विभागाने कारवाई केलेल्या काळाखडक झोपडपट्टीमध्ये नागरिकांची हाल होत आहॆ. उन्हात तान्हात काही लोकांचे संसार रोडावर आले, निदान कारवाई करतांना आधी नोटीस दयायला पाहिजे होती असे स्थानिक लोक रोष व्यक्त करीत आहेत आहेत,
पालिकेच्या काळाखडक झोपडपट्टीमध्ये गेल्या दहा दिवसापासून अतिक्रमण विभागाची कारवाई चालू आहे त्यात अतिशय चुकीच्या पद्धतीचे पालिका प्रसासन अतिक्रमण काढतांना ठोक शाही केल्याने नागरिकांनी पालिकेविरोधात रोष व्यक्त केला.

वाकड काळा खडक झोपडपट्टी येथील प्रभाग क्रमांक 37 मधील काही दिवसापासून बिना नोटीस देता अतिक्रमणे केले आहे यामध्ये काहींचे घर,बाथरूम, दुकाने हे सगळं तोडण्यात आले सगळं काम करत असताना संडास बाथरूम चे पाईपलाईन पाण्याचे कनेक्शनचे पाईप लाईन तोडण्यात आले आहे आज त्या गोष्टीला चोवीस तास उलटून गेले पण त्यांनी संडास चे पाईप कनेक्शन व दररोज लागणाऱ्या आंघोळ बाथरूम हे सगळं तोडण्यात आले होते याचे काही दुरुस्ती अजून पर्यंत करून दिले नाही राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर व अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती चे प्रदेश अध्यक्ष सौ प्रफुल्लाताई मोतलिंग हे उपस्थित राहून सगळ्या प्रकाराची शहानिशा करून वरिष्ठांशी संपर्क करून तुटलेले पाण्याचे कनेक्शन जोडून दिले व ज्यांचे बाथरूम तुटले आहेत त्यांना पूर्ण परत एकदा बांधून देण्याचे आश्वासन महापालिकेने दिले होते पण अजून पर्यंत त्याचा पाठपुरवठा झाला नाही येत्या दोन दिवसात जर ते काम पूर्ण करून दिले नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे या कारवाईने किती गरीब बेघर झाले आहेत पोटावर असणाऱ्यांचे काम हे बंद झालेत त्यामुळे उपास मारायची वेळ त्यांच्यावर आली आहे.




