देश-विदेश

ऍपच्या माध्यमातून पावसाला कमी जास्त करता येणार, भाजप नेत्याचा अजब दावा!

पावसाला कमी जास्त करता येणार ऍप

उत्तराखंडच्या मुसळधार पावसाची देशभर चर्चा होत असते. कारण, अनेकदा हा पाऊस मोठ्या प्रमाणात साधनसंपत्तीचं नुकसान करतो. येथील महापुरात अनेकदा जीवितहानी होते. त्यामुळे, येथील पावसापूर्वी हवामान खात्याचे अलर्ट आणि पूर्वउपाययोजना महत्त्वाच्या ठरतात. यासंदर्भात येथील आपत्ती व्यवस्थापनमंत्री धनसिंह रावत यांनी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

उत्तराखंडचे आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापनमंत्री धनसिंह राव यांच एक विधान सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, पावसासंदर्भात माहिती देताना, मंत्रीमहोदयांनी एका अ‍ॅपबद्दल सांगितलं आहे. त्यामध्ये पावसाला कमी-जास्त किंवा पुढे-मागे नेता येतं, असे रावत यांनी म्हटलं आहे. रावत यांच्या व्हिडिओवरुन त्यांची खिल्ली उडविण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे