आपल खान्देशराजकीय

पाचोरा तालुक्यातील नेरी वि.का.सो.नवनिर्वाचित संचालकांचा भाजपात अधिकृत प्रवेश..


झूम मराठी वृत्तसेवा

पाचोरा (झूम मराठी) नेरी विकास सोसायटी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीचे औचित्य साधत नवनिर्वाचित सर्व संचालकांचा सत्कार व भाजप प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नेरी चे सरपंच सचिन विश्वासराव पाटील व श्री अमोल भाऊ शिंदे भाजपा तालुकाध्यक्यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित चेअरमन श्री अशोक धर्मराज पाटील व व्हा चेअरमन सोमा दगा अहिरे यांच्यासह सर्व संचालक मंडळाचा सत्काराचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक आदिल दादा पठाण यांच्यासह बशीर दादा पठाण व सोमा दादा अहिरे व अनेक तरुणांनी भाजपा अधिकृत प्रवेश केला याप्रसंगी गावातील शेतकरी प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग उपस्थित होता मागील काळातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पासून नेरी येथे भाजपाचे मताधिक्य वाढतच आहे विधानसभेच्या वेळेस अमोल भाऊ शिंदे यांना देखील नेरी मधून विक्रमी मताधिक्य मिळाले होते ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली एक हाती सत्ता स्थापन केली आणि आता विकास सोसायटी वरही भाजपचेच निर्विवाद वर्चस्व राहिले नेरी गावाने अमोल भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत या सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला जे झुकतं माप दिले त्याबद्दल नेरी ग्रामस्थयांचे आभार मानले याप्रसंगी नवनिर्वाचित सर्व संचालक मंडळ ग्रामपंचायत सदस्य सर्व सन्माननीय ग्रामस्थ भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रशेखर पाटील देवीदास पाटील समाधान पाटील समाधान बोरसे कल्पेश सोनगिरे रतन अहिरे इत्यादी मेहनत घेतली, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री नेहते साहेब यांनी काम बघितले तसेच श्री वानखेडे यांनी त्यास सहकार्य केले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे