आपल खान्देश

पाचोऱ्यात दिल्ली येथील जंतर मंतर च्या घटनेचा निषेध, उपाध्यायवर गुन्हा दाखल ची मागणी

पाचोऱ्यात दिल्ली येथील जंतर मंतर च्या घटनेचा निषेध :उपाध्यायवर गुन्हा दाखल ची मागणी करताना.

पाचोरा (प्रतिनिधी) – दिल्ली येथील जंतर-मंतर ला धार्मिक विद्वेष भडकवणार्या मुस्लिम समुदायाच्या संहाराचे आवाहन करणार्‍या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी पाचोरा पोलीसात निवेदन देण्यात आले

दिल्ली येथील जंतर मंतरवर भाजपा च्या उपाध्याय सह इतरांनी एकाच धर्माविरुद्ध घोषणा देऊन जणु काही दुसर्‍या फाळणीला जन्मदेत आहे असे वातावरण निर्माण करीत आहेत, एका विशिष्ट समाजाला लक्ष करून देशात धार्मिक विद्वेष निर्माण करुन त्या समाजाच्या नरसंहाराचे आवाहन करणारे हे समाज कंटक देशात आरजकता माजवु पहात आहे. ही घटना धर्मनिरपेक्ष भारतीय लोकशाहीला जागतिक पातळीवर काळीमा फासणारी आहे भारतीय संविधान आणि भारतीय दंड संहिता विधान मोडीत काढणारी आहे. यांच्या विरोधात पाचोरा पोलीसात भादवी १५३अ कलमा खाली गुन्हा दाखल व्हावा म्हणून आज एका शिष्टमंडळाने पोलीस ठाण्यात भेट देऊन गुन्हा दाखल ची मागणी केली यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अॅड अभय पाटील,पत्रकार प्रविण ब्राह्मणे, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रवक्ते खलिल देशमुख, शहर अध्यक्ष अझर खान, माजी नगराध्यक्ष नसीर बागवान, नगरसेवक अशोक मोरे, भिमराव खैरे, अझर मोतीवाला,मुस्लिम बागवान, अॅड मंगेश गायकवाड,अॅड. अब्दुल वहाब, मतीन बागवान, जहीर खाटीक, साजीद खान, आफताफ खाटीक, अकील शेख, नंदलाल आगारे, रीयाज बागवान, हमीद शाह आदींनी डी. वाय एस पी श्री काकडे, सहा. पोलीस निरीक्षक श्री मोरे यांना निवेदन देऊन तात्काळ गुन्हा दाखल ची मागणी केली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे