आपल खान्देशमहाराष्ट्रराजकीय

धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या कारवाईचा निषेध..

धुळे (झूम वृत्तसेवा) विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर चालू अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जयंत पाटील (Jayant Patil) यांना हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहता येणार नाही. यावरून विरोधकांनीही दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असून त्यांनी विधान भवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या मांडला आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी आमदार जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे, असे म्हणत महाविकास आघाडीचे नेते सरकारविरोधात हे ठिय्या आंदोलन करत आहेत.

माहितीनुसार, आता जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या कारवाईविरोधात धुळ्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र घोषणाबाजी करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी सत्ताधाऱ्यांतर्फे चुकीच्या पद्धतीने सत्तेचा वापर करून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. या निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी तीव्र घोषणाबाजीदेखील या कार्यकर्त्यांतर्फे करण्यात आली आहे. यासोबतच, जयंत पाटील यांच्‍यावरील निलंबनाची कारवाई तत्काळ मागे घेण्यात यावी, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे