बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये १५० जागांसाठी भरती
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरलिस्ट ऑफिसर या पदाच्या १५० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जनरलिस्ट ऑफिसर या पदाच्या १५० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदासाठी इच्छिुक पात्र उमेदवारांना ६ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या पदाची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २२ मार्च २०२१ पासून सुरू झाली असून शेवटा अर्ज ६ एप्रिल २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी भरु शकता. २५ ते ३५ वर्षे वयोगटातील उमेदवाराच या पदासाठी अर्ज करु शकतात
बँक ऑफ महाराष्ट्रकडे जनरलस्टिस्ट ऑफिसर पदासाठी एकूण १५० रिक्त पदांपैकी अनारक्षित प्रवर्गासाठी ६२, ओबीसीसाठी ४०, एससीसाठी २२, ईडब्ल्यूएससाठी १५ आणि एसटी प्रवर्गासाठी ११ जागा आरक्षित आहेत. परंतु यासाठी उमेदवारासमोर शिक्षणाच्या अटी देखील ठरवून दिल्या आहे. या पदासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून कोणत्याही विषयात किमान ६०% गुणांसह पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे. किंवा मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठ / संस्थांकडून सीए / आयसीडब्ल्यूए / सीएफए / एफआरएमसारखे व्यावसायिक कोर्स केलेला असणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँकेत अधिकारी म्हणून ३ वर्षांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या जनरलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करताना सर्वसाधारण श्रेणीसाठी शुल्क ११८० रुपये असेल. अनुसूचित जाती / जमाती उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ११८ रुपये करण्यात आले आहे. महिला आणि दिव्यांग उमेदवारांसाठी (PwBD) अर्ज प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या पदासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे निवड केली जाणार आहे.
अधिक सविस्तर माहितीसाठी उमेदवार बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत संकेतस्थळाला bankofmaharashtra.in ला भेट देऊन वाचू शकतो.


