आपल खान्देशराजकीय

भाजपने ओबीसी नेत्यांवर अन्याय केला- मेहबूब शेख

धुळ्यात शरद युवा संवाद यात्रेच्या निमित्ताने आले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी युवकांशी संवाद साधत तसेच युवकांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना सखोल मार्गदर्शन केले.

झूम मराठी वृत्त

धुळे (दिलीप परदेशी) भाजपातील ओबीसी नेत्यांवर भाजपानेच अन्याय केला असून कालांतराने त्यांना संपवण्याच कामदेखील केले आहे. असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजपावर केला आहे. ते धुळ्यात आयोजित शरद युवा संवाद यात्रेच्या निमित्ताने बोलत होते.

भाजपाच्या कार्यकर्त्यांनी १९९० च्या काळात ग्रामीण भागात प्रवेश दिला जात नसताना, त्यावेळी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे यांनी भाजपा वाढवण्यासाठी मेहनत घेतली. मात्र आज त्याच भाजपामध्ये गोपीनाथ मुंडे यांची कन्या व एकनाथ खडसे यांचे काय अवस्था केली. हे सर्वांनाच माहीत आहे. विरोधी पक्षनेता असलेला व्यक्ती हा नियमाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असतो. मात्र, ऐन वेळेस नागपूरच्या देवेंद्र फडणवीस यांना बसवून एकनाथ खडसे यांच्यावर अन्याय केला असल्याचे देखील ते म्हणाले. तसेच विनोद तावडे व चंद्रशेखर बावनकुळे यांचे देखील भाजपाने खच्चीकरण केल असून त्यांचे देखील भाजपा ने विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट कापले होते. कुठतरी ही बहुजन मंडळी मुख्यमंत्री पदाची दावेदार झाली होती. म्हणून त्यांच्यावर भाजपाने अन्याय केला.

एकंदरीत या सर्व बहुजन तसेच ओबीसी नेत्यांवर भाजप आणि सातत्याने अन्याय केला आहे. भाजपाने राज्यात द्वेषाचे राजकारण केले असून, पक्ष सोडून गेलेली एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या मुली व त्यांच्या पत्नीला देखील ईडीने नोटीस पाठवली. आज काल बसच्या तिकिटापेक्षा ईडी ची नोटीस तात्काळ येते असा मिशकील टोला देखील शेख यांनी लगावला.

तसेच संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात फुल लावणारा माणसाला देखील ईडीच्या वतीने नोटीस आली. राज्यात चालले तरी काय? कसा खरपूस समाचार शेख यांनी भाजपाचा घेतला आहे.ते धुळ्यात शरद युवा संवाद यात्रेच्या निमित्ताने आले होते. त्या कार्यक्रमात त्यांनी युवकांशी संवाद साधत तसेच युवकांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रंजीत राजे भोसले, किरण शिंदे, युवक शहराध्यक्ष कुणाल पवार, मयूर बोरसे, रजनीश निंबाळकर, वाल्मीक मराठे, निखिल मोमाया, सत्यजित शिसोदे, शकीला बक्ष यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे