आरोग्य व शिक्षणदेश-विदेशमहाराष्ट्र

लहान मुलांच्या लसीकरणासाठी 1 जानेवारीपासून नोंदणीला होणार सुरुवात

झूम मराठी वृत्तसेवा

भारतात 2-18 वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीला मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यास मान्यता दिली आहे. DCGI ने कोव्हॅक्सिनला लसीला मान्यता दिली आहे. DCGI नं कोव्हॅक्सिनला दिलेल्या परवानगीनंतर आता देशभरात लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानुसार 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण येत्या 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मात्र, त्यासाठीची नोंदणी 1 जानेवारीपासून सुरु होणार आहे.

Cowin पोर्टलवर ही नोंदणी करता येणार आहे. खरे तर 12 वर्षांच्या पुढील मुलांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, केंद्र सरकारने तूर्तास 15 वर्षांवरील मुलांचे लसीकरण करायला मान्यता दिली आहे. ओमिक्रॉनच्या विषाणूमुळे जगभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. हे पाहता अमेरिका आणि इंग्लंडसारख्या ठिकाणी मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता भारतातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

देशात ३ जानेवारी २०२२पासून १५ ते १८ वर्षांतील मुलांचे लसीकरण मोहीम सुरू होणार आहेत. प्रौढाप्रमाणे मुलांना देखील लसीकरणासाठी नोंद करावी लागणार आहे. मुलांच्या लसीकरणासाठी नोंद करण्याची प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू होणार आहे. कोविन अॅपवर मुलांच्या लसीकरणाची नोंद होणार आहे. नॅशनल हेल्थ अॅथॉरिटीचे सीईओ डॉ. आरएस शर्मा यांनी सांगितले की, १ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षांची मुलं लसीकरणासाठी नोंद करू शकतात. पण लसीकरणाची नोंद करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायन्सस नसल्यास पर्याय म्हणून लहान मुलं १०वीचे मार्कशीट आणि शाळेचे आयडी कार्ड वापरू शकतात अशी माहिती डॉ. शर्मा यांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे