राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची २९७ जयंती व मान्यवरांचे सत्कार डोंबीवली येथे उत्साहात संपन्न
झूम मराठी वृत्तसेवा
डोंबिवली (झूम मराठी राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची २९७ जयंती व समाजातील मान्यवरांचे सत्कार उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ/ठाणे जिल्हा धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने डोंबिवलीत आयोजित करण्यात आला .

उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ/ठाणे जिल्हा धनगर समाज संघर्ष समिती आयोजित करण्यात आलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त व आपल्या धनगर समाजातील पदोन्नती झालेले श्रीमती उज्वलताई राजेश गढरी (सहाय्यक लेखाधिकारी श्रेणी २, मंत्रालय मुंबई), सेवानिवृत्त श्री.दत्तात्रय पांडुरंग परदेशी ( ONGC), .प्रदीप रामचंद्र परदेशी (महानंद डेअरी) जगदीश परदेशी (BMC) तसेच धनगर समाजातील पुढारी कै प्रताप श्रावण परदेशी यांचे नातू चेतन रवींद्र परदेशी (कराटे चॅम्पियन) यांचा शाल ,पिवळे उपरणे व अहिल्यादेवीची प्रतिमा देवुन सत्कार करण्यात आले. सत्कार मुर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले, सुकदेव पडलकर, रविंन्द्र शेळके, यांच्या सह समाजातील जेष्ठ व श्रेष्ठ मंडळी व तरुण वर्ग ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघ व ठाणे जिल्हा धनगर समाज संघर्ष समिती आणि महाराष्ट्र यशवंत सेनाचे सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली, सदर कार्यक्रमाला मोठया प्रमाणात आपले धनगर समाज बांधव उपस्तीत होते. सुत्रसंचलन आण्णा साहेब रामा पवार तर आभार संदिप पांढरे यानी मानले.




