मराठवाडामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज ओबीसी होते; महादेव जानकर यांचे वक्तव्य

परभणी : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे ओबीसी होते. माझे 30-35 आमदार होऊ द्या, मराठासह मुस्लीम समाजाला देखील आरक्षण देतो, असे वक्तव्य केले आहे. परभणीतील गंगाखेड तहसीलसमोर ओबीसी संघटनांनी आरक्षणासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास महादेव जानकर यांनी आज सोमवारी भेट दिली. यावेळी बोलताना जानकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, कुळवाडीभूषण राजा होते.

महादेव जानकर म्हणाले की, आम्ही सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो. माझे 30-35 आमदार होऊ द्या. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा दहा मिनीटात मार्गी लावतो. तसेच मराठा आणि मुस्लीमांना देखील आरक्षण देतो. असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. यावेळी जानकर यांनी थेट शाहू महाराज ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. तसेच शिवाजी महाराज ओबीसी होते असेही ते म्हणाले.

जानकर म्हणाले, शाहू महाराजांनी देशात पहिलं आरक्षण दिले, ते मराठ्यांचे होते. मराठ्यांना पहिलं आरक्षण नव्हते. त्यानंतर मराठ्यांचे आरक्षण का गेलं? छत्रपती शिवाजी महाराज देखील ओबीसी होते. छत्रपती शिवाजी महाराज, कुळवाडीभूषण राजा होता. त्यावेळी मराठ्यांना वाटले आम्ही सर्वत्र मिरवतो, आम्हाला नको ते आरक्षण आणि आज काय अवस्था झाली आहे बघा, असं महादेव जानकर म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे