आपल खान्देश

कौतुकास्पद ! रस्त्यावर सापडलेला महागडा मोबाईल प्रामाणिकपणे मूळ मालकास केला परत

पो.ना.राकेश खोंडे व पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. विशाल हटकर, हे दोघे मोटारसायकल ने पुनगाव रस्त्यावरून जात असतांना त्यावेळी त्यांना रस्त्यात सापडलेला महागडा अँड्रॉइड मोबाइल त्यांनी प्रामाणिकपणे मूळ मालकाला परत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

पाचोरा येथील पुनगाव रोड परीसरात सागर सुरेश पाटील रा.पाचोरा या तरूणाचा मोबाईल पुनगाव रस्त्यावर दुपारी ०२:३० ते ०३:०० वाजे दरम्यान हरवला होता. पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पो.ना.राकेश खोंडे व पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. विशाल हटकर, हे दोघे मोटारसायकल ने पुनगाव रस्त्यावरून जात असतांना त्यांना रस्त्याच्या कडेला अँड्रॉइड मोबाईल पडलेला असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मोबाईल उचलून बघितल्यावर तो अँड्रॉइड मोबाईल बंद होता.

सदर मोबाईल बंद असल्याने तो मोबाईल कोणाचा आहे ओळखणे शक्य झाले नाही. त्यामुळे सापडलेला मोबाईल पो.ना.राकेश खोंडे व विशाल हटकर यांनी प्रामाणिक पणाने पाचोरा पोलीस स्टेशनला जमा केला होता.

याच दरम्यान सागर सुरेश पाटील या तरूणाने मोबाईल हरवल्याची तक्रार पाचोरा पोलीसात दाखल केलेली होती.

पोलीसांनी सागर पाटील यास पोलिस स्टेशनला बोलाऊन घेत मोबाईलची ओळख पटवण्यासाठी बील तपासुन खात्री केल्यानंतर तो सापडलेला मोबाईल सागर पाटील याचाच असल्याचे सिध्द झाल्यावर पाचोरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विजया वसावे, ठाणेअंमलदार पो.ना.सुर्यकांत नाईक, पो.ना.राकेश खोंडे, प्रशांत पाटील, विशाल हटकर यांच्या समक्ष सागर पाटील याला त्याचा मोबाईल देण्यात आला.

मोबाईल मिळाल्याबद्दल व पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल सागर पाटील याने पो.ना.राकेश खोंडे, विशाल हटकर व पाचोरा पोलिसांचे आभार मानले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे