आपल खान्देश

माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती देण्यास पिंपळगाव बु|| ग्रामपंचायत करतेय टाळाटाळ

पिंपळगाव बु|| ग्रामपंचायत अनेक घोटाळे झाले असून त्यातून अनेकांनी आपली आर्थिक स्थिती भक्कम करून शासनाची फसवणूक केली आहे असा आरोप आर टी आय कार्यकर्ते यांनी केला आहे

संभाजी पाटील – प्रतिनिधी

भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बु|| (थंडीचे) ग्रामपंचायत अनेक घोटाळे झाले असून त्यातून अनेकांनी आपली आर्थिक स्थिती भक्कम करून शासनाची फसवणूक केली आहे.त्यात विविध योजना न राबविता त्या कागदावरच दाखवून शासकीय निधीचा अपहार,पाणीपट्टी – घरपट्टी वसुली रकमेत अफरातफर करण्याचा प्रयत्न केला आहे.

आपले भ्रष्टाचाराचे पितळ उघड पडत आहेत. त्यातही प्रकार जर गंभीर असेल तर बघायलाच नको. आपल्यावर या माहितीतून आपत्ती येऊ शकते ग्रामपंचायतचा पाणीपट्टी – घरपट्टी वसुली रकमेत अफरातफर भ्रष्टाचार उघड होऊ शकतो, हे पाहून माहिती देणे टाळण्यावर भर देण्यात येत आहे अशी चर्चा गावात होत आहे 

ग्रामपंचायत येथे सहा महिने प्रशासक रुजू असतांना प्रशासकांचा सहा महिन्याचा कार्यकाळ व आज पर्यंत गावातील घरपट्टी पानपट्टी व इतर कर आकारणी संदर्भात माहिती अधिकार अर्जदार पिंपळगाव बु।। येथील रहिवासी असलेले अमोल ईश्वर पाटील यांनी  एक महिना झाला तरी  अधिकारान्वये माहितीचा अर्ज दाखल केलेला आहे. आज पर्यंत माहिती देण्यास टाळा टाळ करत आहेत


पिपंळगाव बु || गावात दिवसेंदिवस ही चर्चा जोरदार रंगत असल्यानं घोटाळेबाजांचे धाबे दणाणले असल्याचे सांगितले जात असून, पिपंळगाव ग्रामपंचायत पाणीपट्टी – घरपट्टी वसुली रकमेत अफरातफर कारभारातील माहिताचा अधिकारातून आर टी आय कार्यकर्ते अमोल ईश्वर पाटील यांनी दिनांक २० सप्टेंबर २०२१ रोजी माहिती अधिकारान्वये माहितीचा अर्ज दाखल केलेला आहे. आज पर्यंत माहिती दिलेली नाही, माहिती देण्याचा विशिष्ट कालावधी असताना गेल्या चोवीस दिवसांपासून कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. उपोषणास बसणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे