ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगरमध्ये कोरोनाचा उद्रेक ; नवोदय विद्यालयातील 19 विद्यार्थी कोरोनाबाधित

झूम मराठी टाइम्स

अहमदनगर :- कोरोनाच्या भीतीमुळे चाचपडत सुरू करण्यात आलेल्या शाळा आता कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याचे चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील 19 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, अहमदनगर येथील विद्यार्थ्यांचा समावेश यामध्ये आहे. अद्यापही विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी सुरू असून बधितांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

या नवोदय विद्यालयातील 9 विद्यार्थ्यांना गुरुवारी कोरोना सदृश्य लक्षणं आढळून आली. त्यांची तपासणी टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. नवोद्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं तपासणीत आढळून आल्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांच्या शुक्रवारी सकाळी चाचण्या करण्यात आल्या. यात आणखी 10 विद्यार्थ्यांना आणि एका संगीत शिक्षकाला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं. या सर्व कोरोनाबाधित रुग्णांना पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयातील कोव्हिड सेंटरमध्ये आरोग्य विभागाने दाखल केलं.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, गटविकास अधिकारी किशोर माने यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश लोंढे, डॉ. अन्विता भांगे, डॉ. स्वाती ठुबे यांच्यासह आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने 410 चाचण्या सुरू केल्या. दरम्यान, जवाहर नवोदय विद्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे