आपल खान्देश

जळगावात भारत बंद आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद

जळगाव : केंद्र शासना विरोधातील भारत बंद मध्ये जळगाव राष्ट्रीय काँग्रेस पूर्ण ताकदीने सहभागी, केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणांचा देशभरात कडाडून विरोध होतोय. त्याचे पडसाद आंदोलनाच्या माध्यमातून उमटत आहेत. जळगाव जिल्ह्यात अनेक भागांत भारत बंदला प्रतिसाद देत राष्ट्रीय काँग्रेस तर्फे निदर्शने करण्यात आली.

 जळगावात भारत बंद आंदोलनाला मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे, कार्यकर्त्यांनी दुकान बंद केली मात्र आंदोलन कर्ते गेल्यानंतर लगेचच लोकांनी आपले व्यवसाय सुरू केले.काँग्रेस माजी खासदार डॉ उल्हास पाटील तसेच राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, व पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करत केंद्र सरकार वर टीका केली आहे.

संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या २७ सप्टेंबर रोजी च्या भारत बंद मध्ये सामील होत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. श्रीमती सोनिया गांधीजी, मा. राहुलजी गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा.श्री नाना पटोले साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार. राष्ट्रीय काँग्रेस पूर्ण ताकदीने सहभागी होत मोदी सरकार विरोधी फलक हाती घेत निदर्शने केली.

केंद्र शासनाने शेतकरी विरोधी 3 काळे कायदे करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. तसेच रेल्वे, बँका, विमानसेवा, रस्ते, विमा कंपन्या, केंद्र शासनाच्या मालकीचे सार्वजनिक उद्योग, दूरसंचार आणि बंदरे अश्या प्रकारे मोदी सरकारने देशाची संपत्ती विकण्याचा सपाटा लावला असून प्रतिवर्षी २ कोटी तरुणांना रोजगार देण्याचेेे आश्‍वासन न पाळता उलट युवकांना बेरोजगार केले असून दिलेले आश्वासन संपुष्टात आणले आहे.

तसेच वाढती महागाई विरोधात, पेट्रोल, डिझेल, गॅस, दरवाढी विरोधात लोकभावना लक्षात घेता. आज सोमवार रोजी भारत बंद आंदोलन पुकारले आहे. अदानी, अंबानींना आर्थिक लाभ मिळवून देण्याकरिता केंद्र शासनाने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचेेे धोरण अवलंबल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते भारत बंद मध्ये सक्रिय सहभाग घेऊन विरोध दर्शविला.

या आंदोलनाला कर्जत तालुका काँग्रेसने कर्जतच्या टिळक चौकात केंद्रातील मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात शेतकरी संघटनानी आज भारत बंदची हाक दिली असून काँग्रेसने या भारत बंद आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे