शिवसैनिक तयार असतील, सभेत घुसा आणि परत जाऊन दाखवा; ठाकरे गटाचे गुलाबरावांना आव्हान..
येत्या २३ एप्रिल रोजी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा होणार आहे. माजी आमदार स्वर्गीय आर.ओ. पाटील यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी(Vaishali Suryavashi) यांनी या सभेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंचे स्वागतच आहे, परंतु, संजय राऊतांसारख्या माणसाने या सभेत चौकटीत राहून बोलावे. माझ्याबद्दल काही चुकीचे बोलला तर सभेत घुसेल, असे थेट आव्हान शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. यावरून संजय राऊतांनीही (Sanjay Raut)त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
गुलाबराव पाटलांच्या(Gulabrao Patil) या इशाऱ्यावर संजय राऊतांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. “घुसा घुसा. तुमची आम्ही वाट बघत आहोत. घुसा आणि परत जाऊन दाखवा, असं प्रतिआव्हान राऊतांनी गुलाबराव पाटलांना दिले आहे.
तर दुसरीकडे ठाकरे गटाचेच नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही गुलाबराव पाटलांना थेट आव्हान दिले आहे. गुलाबराव पाटील फक्त बोलतात. मात्र त्यांच्या दम नाही. त्यांनी सभेत घुसावे आमचे शिवसैनिक तयार असतील, असा इशारा दानवे यांनी दिला.



