वीजबील वाढ विरोधात व एस.टी.कर्मचा-यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ जळगावात बहुजन मुक्ती पार्टीने जेल भरो आंदोलन!
बहुजन मुक्ती पार्टीने जळगाव एस.टी.बस स्थानकात केले जेलभरो आंदोलन
जळगाव (प्रतिनिधी) वीजबील वाढी विरोधात व एस.टी.कर्मचा-यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ आज जळगाव बस स्था नकात आज बहुजन मुक्ती पार्टीने जेल भरो आंदोलन केले.
बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र राज्य सदस्य हारुन मन्सुरी,बहुजन मुक्ती पार्टीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष अमजद रंगरेज,बहुजन मुक्ती पार्टीचे शहराध्यक्ष इरफान शेख,विनोद अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली हे जेलभरो आंदोलन करण्यात आले.
वीज बील विरोधातील आंदोलनातील मागण्या थकीत वीजबिलामुळे सरकार तर्फे वीज कनेक्शन तोडणी थांबवावी, २०० युनिट पर्यंतचे वीज बील माफ करणे, मीटरभाडे कपात करण्यात यावे, सक्तीची वीजबिल वसुली तात्काळ थांबवावी.
एस.टी.कर्मचा-यांच्या मागण्या एस.टी.चे विलीनीकरण महाराष्ट्र शासनात करण्यात यावे, आत्महत्या करणा-या कर्मचाऱ्यांना तात्काळ १ कोटी रुपयांची मदत करुन त्यांच्या वारसांना १ महिन्यात शासकीय नोकरी द्यावी., कोरोना मध्ये मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपये द्यावे., एस.टी.कर्मचा-यांना लावण्यात आलेल्या शिस्त व आवेदन प्रणाली रद्द करण्यात यावी., निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्यात यावे.

एस.टी.स्थानकात जोरदार निदर्शने करुन सुमित्र अहिरे, राजेंद्र खरे, सुधाकर बडगुजर, गेमा बारेला, रेवसिंग बारेला,सुनिल देहडे,सुकलाल पेंढारकर, देवानंद निकम, खुशाल सोनवणे, सुलतान शेख, संतोष शेंडगे, नागराज ढिवरे, सुरेश तायडे, अनिता पेंढारकर, संगिता देहाडे, माया निकम, कल्पना म्हस्के, कांचन सोनवणे, अर्पणा म्हस्के, शे.फहीम शे.सलीम, शाकीर शेख, झाकीर खाटीक, मुस्ताक शेख कुंदन तायडे, शेख सद्दाम, धोबी मॅडम, यांनी स्वःताला अटक करुन घेतली.
या आंदोलनाचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांना अमजद रंगरेज,राजु खरे,हारुन मन्सुरी, इरफान शेख, डॉ शाकीर, विनोद अडकमोल,कुंदन तायडे,यांनी निवेदन दिले.


