आज पाचोरा शहरात जातीय सलोखा स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार..
झूम मराठी न्यूज नेटवर्क
पाचोरा (झूम मराठी ) जळगाव पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून जळगाव जिल्हा पोलीस दल तर्फे सामाजिक ऐक्य व सर्व धर्म समभाव जोपासण्यासाठी जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
सध्याची राजकारणाची परिस्थिती पाहता समाजकारण पेक्षा वैयक्तिक वादावर जास्त भर दिला जात आहे त्यामुळे राजकारणातील प्रतिमा उंचावण्याचे आयोजि राजकारणाची एकमेकावर चिखलफेक सुरू आहे त्याचा परिणाम वेगळा होत असून त्याचा परिणाम जातीय राजकारण होत असतो ते कुठेतरी थांबले पाहिजे म्हणून तसेच जळगाव जिल्ह्यात सर्वधर्मीय शांतता राखावी यासाठी जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी एक नवीन संकल्पना आणून त्याची अंमलबजावणी पाचोरा पोलिस अधिकारी यांनी सर्वपक्षीय नेते यांना बोलावून सर्वधर्मीय स्वाक्षरी मोहीम राबविण्याची संकल्पना आज पाचोरा शहरात छत्रपती शिवाज महाराज चौक येथे होणार असुन यावेळी पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील माजी आमदार दिलीप वाघ भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे पाचोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री सचिन सोमवंशी उपस्थित राहणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे पाचोरा तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे पोलीस निरीक्षक किसनराव पाटील यांनी केले आहे.



